Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

बहर

मृदुला कांबळे

0 4 8 2 9 3

बहर

लेखणी हाती घेतली मी
काव्य लेखनाला आला बहर..
शब्दमाळ गुंफू लागले मन
यमक जुळवीत सुरु झाला सफर..

काव्य रचना माझी सौंदर्यवती
ल्यायली शब्दांचे मोहक अलंकार…
पानावर पसरली काळी शाई
वाटते जणु तिचा दाट केशसंभार….

लयबद्ध ओळी रचल्या
त्याला कल्पनेची नाजूक किनार..
आशयपूर्ण रचनेसाठी कष्ट जीवापाड
तेंव्हा बहरतो हा भावनाविष्कार..

ओंजळीत चंद्र ,तारका घेऊनी
मी काव्य नभागंणावरी उधळले..
अंतरीचे भाव शब्दरूपात शिंपूनी
शृंगारिक काव्य जणु कस्तुरीसम दरवळे..

काव्य म्हणजे नाही गंमत
नाही फक्त यमकांची जुळवणी..
त्यासाठी पाहिजे साहित्य साधना
मग बहरते समृद्ध लेखन क्षणोक्षणी..

मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे