0
4
8
2
9
7
किलबिल
आठवणीतली पहाट ती
सोनकिरणांनी मोहरलेली
पाखरांची किलबिल अन्
आरोग्याने जागलेली ॥
मंद मंद वारा अन्
माणूस होता जागणारा
दिनकराच्या स्वागतास्तव
किलबिल पक्षी गाणारा ॥
सांजसकाळी उडती थवे
नभांगणात खेळणारे
किलबिलाटाचे मधूर गाणे
भिंतीवर त्या छेडणारे ॥
आधुनिकतेच्या जाळ्यामध्ये
हरवली ना पहाट ती
उंच उंच टॉवरखाली
मूक झाली किलबिल ती ॥
वृक्षतोड करून मानवा
निवाराही तू संपविला
किटकनाशकाच्या वापराने
उध्वस्त केला कुटुंबकबिला ॥
जाग येता सोनसकाळी
किलबिल कानी पडेल का
नजर भिडता उंच आभाळी
थवे दिसतील का कातरवेळी ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
===========
0
4
8
2
9
7



