Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरधाराशिवसाहित्यगंध

संतदर्शनाची अमृतभेट

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता. उमरगा, जि. धाराशिव

0 5 9 0 3 4

संतदर्शनाची अमृतभेट

एकादशीचा पावन दिवस, पंढरी नगरी सजली ।
संध्याकाळी सहा वाजता, कृपेची वेळच उजाडली ॥१॥

चंद्रभागेच्या तीरावरती, विठ्ठलनामाचा गजर ।
सद्गुरू चंद्रशेखर महाराज भेटले, धन्य झाला हा नजर ॥२॥

हृदयातील गुरुबंधू हरी गुरुजी, सोबत होते प्रेमाने ।
संतसंगाची लाभली मेजवानी, विठ्ठल भेटला भाग्याने ॥३॥

बहु पुण्य केले जन्मोजन्मी, तेव्हा हा विठ्ठल भेटला ।
संतस्वरूपी सद्गुरूंचा, आज चरणस्पर्श लाभला ॥४॥

मस्तक झुकले चरणांपाशी, डोळ्यांत प्रेमाश्रू दाटले ।
संतदर्शनाच्या एका क्षणात, जन्माचे सार्थक वाटले ॥५॥

संतसंगती लाभली जेव्हा, अंतरी विठ्ठल जागा झाला ।
गुरुकृपेच्या पावन छायेत, जीव भक्तिरसात न्हाला ॥६॥

पंढरीची ही पुण्यभूमी, संतकृपेने धन्य झाली ।
हरी गुरुजींच्या सहवासाने, दर्शनाची ओढ पूर्ण झाली ॥७॥

नाही मागणे धन-दौलत, नाही जगाची आस ।
संतचरणी भक्ती लाभो, एवढाच अंतरी विश्वास ॥८॥

आजचा दिवस सुवर्णाक्षरी, हृदयामध्ये लिहिला गेला ।
सद्गुरूंच्या संतदर्शनाने, विठ्ठल माझा भेटून गेला ॥९॥

बहु पुण्य केले तेव्हा हा विठ्ठल भेटला,
संतदर्शनाचा अमृतक्षण जीवनाला लाभला ।
सद्गुरू कृपा, संतसंग आणि विठ्ठलनाम मिळाले,
माझे जन्मोजन्मीचे भाग्य आज फळाला आले ॥१०॥

भावसमर्पण
“संत भेटले पंढरीत, विठ्ठल भेटला अंतरी;
सद्गुरूंच्या कृपेने धन्य झाली, आजची एकादशी पवित्री.”
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥
॥ सद्गुरू चंद्रशेखर महाराज की जय ॥
॥ हरी गुरुजींच्या संतसंगाला मनःपूर्वक प्रणाम ॥

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा, जि. धाराशिव
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे