0
4
8
2
9
0
सौदामिनी
गर्द सावळ्या गगनात
मेघुटांची दाटी झाली
आला अवखळ वारा
सोबतीस होती बिजली
मेघहृदयी गोड थरथर
ती पाहताच चंचला
सैरभैर तो घन जाहला
क्षणभरे दिसता चपला
पाहून नभी दाटी मेघांची
झेपावली विद्युल्लता
चांदणे रूपेरी सांडत आली
धावत सुटली तडिता
आभाळाच्या भाळावर
क्षणप्रभा फाकली
अधरावर जलदांच्या
बेभान होऊनी थिरकली..
वाजे पडघम..धडाडधूम
नाद घुमवी दामिनी
तळपती तलवार अशी
कडाडली सौदामिनी…
स्वाती मराडे,
इंदापूर पुणे
==========
0
4
8
2
9
0



