0
4
8
2
9
0
आठवते का
ती संध्येची कातरवेळ
समोर भूरभूरणारा पाऊस
तुझी हरवलेली नजर
आणि माझं मन सैरभैर
आठवते का
नकळत हवेत गारवा वाढला
तुझा उबदार स्पर्श देही झला
शहारले मन आणि तन दोन्ही
आणि तशातच वीज कडाडली
आठवते का
एकांतात मी भेदरलेली
घाबरून हळूच अंग चोरलेली
पण तुझा आश्वासक स्पर्श
घाबरू नकोस मी आहे ना
आठवते का
पावसाचा जोर वाढलेला
नदी नाल्यांना पूर आलेला
चालतांना पायी खडा आलेला
तशातच माझा तोल गेलेला
आठवते ना
किती पावसाळे सोबत काढले
आता मात्र पावसाने कितीही झोडले
तुझ्याविना असते रे सारे अडले
पण मीच माझी स्वतः सावरले
सविता धमगाये
जि.नागपूर
========
0
4
8
2
9
0



