0
4
8
2
9
4
स्वंयदीप
तूच आहेस तुझ्या
भाग्याचा विधाता
सत्कर्माने होशील
तूच खरा विजेता…!!१!!
कष्टेविण फळ नाही
हाच खरा गुरुमंत्र
स्वयंदीप बनण्याचे
एकमेव हेच तंत्र….!!२!!
दुष्ट विचारांचा आज
करावा समूळ नाश
तेव्हा पसरेल जीवनी
स्वयंदीप खरा प्रकाश .…!!३!!
स्वयंदीप सद्विचारांचा
रातदिन तेवत ठेवावा
संकटाशी दोन हात
धैर्याने सामना करावा ….!!४!!
सकारात्मक आशेचा
स्वयंदीप जेव्हा पेटेल
तेव्हा दुःख निराशेचा
तम कायमचा हटेल….!!५!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
==========
0
4
8
2
9
4



