Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्र

“बदलत्या जीवन शैलीचा मुलींच्या आरोग्यावरील परिणाम” या विषयावर कार्यशाळा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 1 6 5 2

“बदलत्या जीवन शैलीचा मुलींच्या आरोग्यावरील परिणाम” या विषयावर कार्यशाळा

जे. एस. एम महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (दि ०५) महिला विकास कक्ष, जे. एस. एम. महाविद्यालय अलिबाग यांच्या मार्फत बदलत्या जीवन शैलीचा मुलींच्या आरोग्या वरील परिणाम या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत असताना डॉ. रेखा म्हात्रे, प्रयास हॉस्पिटल यांनी प्रतिपादन केले कि, बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजच्या तरुण मुलींना अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि बाहेरील अन्नाचे अतिसेवन यामुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे.

लठ्ठपणा, पीसीओडी ,अशक्तपणा , मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक आरोग्य समस्या,जीवनसत्त्वांची कमतरता या सारखे आजार आणि समस्या निर्माण होत आहेत. यासाठी मुलींनी चांगल्या सवयी, व्यायाम आणि सकस व पौष्टिक आहार घेतला पाहिजे. याबाबत सविस्तर माहिती डॉ. रेखा म्हात्रे यांनी महाविद्यालयीन मुलींना दिली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला विकास कक्ष आणि अंतर्गत समिती प्रमुख प्रा. वर्षा पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकात महाविद्यालयीन मुलींनी आधुनिक काळात आपले आरोग्य जपले पाहिजे असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील मॅडम, प्रा. जयश्री पाटील मॅडम, प्रा. शिल्पा कवळे मॅडम, प्रा.प्रीती पाटील, तसेच संचिता टिवळेकर तसेच प्रा. सुनिल ठोकळे सर तसेच महाविद्यालयांचे सहकारी प्राध्यापक, कर्मचारी आणि एकूण 50 विद्यार्थिनी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे