Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

‘आभारीय शब्दसुमनांजली’; सुजाता सोनवणे

निःपक्षपातीपणे सर्वांच्याच रचनेचा गौरव इथे केला जातो

0 4 8 2 8 6

आभारीय शब्दसुमनांजली’; सुजाता सोनवणे

निःपक्षपातीपणे सर्वांच्याच रचनेचा गौरव इथे केला जातो

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा
सोहळ्याची वर्षपूर्ती आज,
शुभदिनी प्राप्त संस्मरणीय
सर्वोत्कृष्ट सन्मानाचा ताज.’

नवसंजीवनी देणारा आ.सरांचा ‘तुमचा फोटो पाठवा’ हा मेसेज रात्री उशिरा पाहिला. रात्रीच आमच्या सोसायटीत श्रीराम मूर्तीचे आगमन, उल्हासाचे अगणित क्षण..यानिमित्ताने लहान मुलाचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. तिकडून घरी आल्यावर मेसेज पाहताच सुखावले अंतर्मन.. सर्वोत्कृष्ट पोस्टरच्या उत्सुकतेने दाटले विचारघन. एरवी लवकरच करते शवासन. पण अत्यानंदाने येईना झोप. सकाळी त्रिवेणी सर्वोत्कृष्टचे पोस्टर पाहून प्रसन्न झाले अवघे मन.

‘मराठीचे शिलेदार’ समूहांतर्गत आज माझ्या त्रिवेणी रचनेला सर्वोत्कृष्टचा ताज देऊन लेखणीला सन्मानित करण्यात आले याबद्दल समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय श्री.राहूल सर, सन्माननीय सौ.पल्लवीताई समूहाच्या प्रशासक प्रिय सौ.सवूताई, सहप्रशासक मुख्य संकलक वंदनीय वैशुताई, स्वातीताई, वृंदा ताई तारकाताई, सुधाताई, अरविंद सर, संग्राम दादा, अशोक दादा, हंसराज दादा, विष्णु दादा व समूहातील सर्व प्रेरक दादा ताईंचे अंतःकरणापासून खूप खूप ऋणयुक्त धन्यवाद.

आ.सरांनी काल त्रिवेणी समूहात ‘लपून छपून’ हा विषय दिला होता. मग काय विचारता कल्पनेच्या घोड्यांसोबतच वास्तवदर्शी विचारांचे दृश्य डोळ्यासमोर ठेवून चार त्रिवेणी रचना साकारल्या त्यातली मला जास्त भावलेली तीच मान्यवर परीक्षकांना भावली. दीर्घकाळानंतर माझ्या रचनेला सर्वोत्कृष्टचा मान मिळाला. हे पाहून मी खरोखरच अंतर्मनी सुखावली. माय मराठीच्या संवर्धनासाठी अविरत तळपणाऱ्या ज्ञानसूर्यास अनंत नमन. सोबतच कर्तव्यरूपी आहुती देणारी समस्त प्रशासकीय टीमचे योगदान अतुलनीयच.

“मराठीचे शिलेदार समूहाचा
परिसस्पर्श मज लाभला
धन्य कृतार्थ अंतःकरण
नवआशेचा किरण गवसला.”

‘कृतज्ञता हा मानवी जीवनाचा सर्वात अनमोल दागिना आहे’.प्रत्येकाला यशाच्या शिखराकडे वाटचाल करण्याची अनमोल संधी प्राप्त करून देणारे गुरु आदरणीय राहूल सर सौ.पल्लवीताई समस्त प्रशासकीय टीमची सदैव ऋणी.समूहातील शिलेदार शब्दप्रभूंच्या सानिध्यात माझी लेखणी बहरली.याच समूहात चारोळी ते काव्यप्रवास सुरू झाला आणि स्वतःच्या वैयक्तिक कामासवे ‘कवयित्री’ या महान शब्दाचा अनोखा सन्मान देऊन गेला. जो शालेय सामाजिक स्तरावर वावरताना एक आदरपूर्वक नामोल्लेख केला जातो. तो फक्त नि फक्त ‘मराठीचे शिलेदार’ समूहामुळेच. पण सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. काही वेळा वेळेअभावी अथवा इतर कारणास्तव लेखणीत सातत्यता नाही असे असूनही निःपक्षपातीपणे सर्वांच्याच रचनेचा गौरव इथे केला जातो. पुनश्च सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.

सौ.सुजाता सोनवणे.
सिलवासा दा.न.ह.
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे