ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
शब्दांजली
पुरुषोत्तम ठोंबरे झिंगाबाई टाकळी, नागपूर

0
5
4
7
7
9
शब्दांजली
शब्द फुलते
मन बहरते
ह्रदय पटलातुनी
शब्दास वाचा फुटते
ते नाजूक, साजूक शब्दांची
शब्दांजली गुंफू या
ओठातून निघे शब्द
भावार्थ समजून घेऊ या
शब्दांच्या माळेमध्ये
शब्द गुंफून घेऊ
प्रेम फुलवून घेऊ
काव्याला आकार देऊ
शब्दांवर माझा विश्वास
शब्द असे आधार
कवितेला येई बहर
शब्दांजली हो॓ई साकार
शब्द फुलवी हर्ष
विचारांना करी स्पर्श
शब्दानेच जीवनी शांती
शब्दांजली फुलवी क्रांती
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
0
5
4
7
7
9



