
0
5
4
9
1
1
सहिष्णुता
अनेक धर्म, अनेक भाषा
तरी आपण सारे समान
सहिष्णूतेच्या छत्राखाली
नांदते लोकशाही महान
संतजनांनी सामान्यांना
दिली शिकवण समतेची
याच रेशीम धाग्याने
वीण गुंफली नात्यांची
मूल्ये असती महान सारी
भारतीय संविधानाची
स्वातंत्र्याचे गीत गाऊया
जपणूक करू मानवतेची
असहिष्णुतेची ज्वाला जळली
तिथे दंगे,अराजक माजले
अंतरीच्या द्वेष अंगाराने
स्वप्न प्रगतीचे होरपळले
सहिष्णुतेची हीच शक्ती
बनवी देशाला बलशाली
विविधतेत एकता जपूनी
संस्कृती जपू वैभवशाली
वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली जिल्हा सांगली
0
5
4
9
1
1



