
0
4
0
8
9
0
सपनातलं लगीन
काय सांगू राजा तुला,
कस सपन मले आलं
माधुरी दिक्षित सोबत
लगीन म्हाया ठरलं
वाजत निघाली दफरे
दोन वराती पुढे चाले
गाव लागलं जवळ की,
त्यांना जोर मात्र चढे
मी पोचलों मंडपी,
जाणोस्यात वऱ्हाडी आले
मंडप होता डहाळ्यांचा,
मध्ये बोहला सजवले
सजून धजून आली,
माधुरी नवरी लाजरी
रुबाबात मी बसलो,
कमरेशी कट्यार धारी
मंगलाष्टके गाताच
अक्षता पडल्या डोईवर
आनंदून गेलो दोघंही,
संसाराचे सपन वरवर
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
0
8
9
0





