Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरसाहित्यगंध

वसंत गाडे गुरुजी: गीताई प्रचारक व सामाजिक कार्यकर्ता

भुमेश्वरीताई सातपुते खोंडे ता. उमरेड जि.नागपूर

0 6 6 7 4 7

वसंत गाडे गुरुजी: गीताई प्रचारक व सामाजिक कार्यकर्ता

माझ्या आईचे नाव रुक्मिणी. ती खूप शिकलेली नव्हती. परंतु तिचे विचार एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीलाही लाजवेल असे होते. आदर्श व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व संस्कार तिने माझ्यावर केले. माझ्या बालपणीची गोष्ट. त्या काळात नागपुरात मातीचे रस्ते होते. एक दिवस मी शाळेत जात असताना मला रस्त्यावरच्या धुळीत एक पैसा सापडला. तो पैसा पाहून मला खूप आनंद झाला. मी तो उचलला आणि धावतच घरी गेलो. पैसा आईच्या हातावर ठेवला तेव्हा आई म्हणाली,”वसंता, आज तू कोणाच्या घरी पाणी भरून दिलं?”

“मी कुणाच्याही घरी पाणी भरून दिलं नाही.?”
“मग कुणाचं दळण आणून दिलं?”
“नाही!”
“कुणाकडे खड्डा खोदून दिला?”
“नाही ग आई. मी खड्डा सुद्धा खोदून दिला नाही.”
“मग हा पैसा तुला कोणी दिला?”
“मला पैसा कोणीही दिला नाही”
“मग कुठून आणलास पैसा? चोरून आणलास? चोरी केली तू?”
आई माझ्यावर रागावली. तेव्हा मी म्हणालो, “आई,मी चोरी कसा करेन. मी तुझा मुलगा ना. मी चोरी केली नाही. मला तो पैसा रस्त्यावरच्या धुळीत सापडला. म्हणून मी तो उचलून आणला.” त्यावर आई म्हणाली,“तुला पैसा रस्त्यावर सापडला ना. कमाई तर केली नाहीस. जा जेथून उचलून आणलास तेथेच नेऊन ठेव.”

आईच्या आज्ञेने मी तो पैसा पुन्हा रस्त्यावर नेऊन ठेवला आणि घरी आलो. आईने मला जवळ घेतले. प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली, “बाळ, घरी पैसे आणायचे ते फक्त स्वतःच्या कमाईचे. श्रम केल्याशिवाय फुकटचे पैसे घेऊ नये.” मित्रांनो, अशी होती माझी आई. अत्यंत स्वाभिमानी. माझ्यात जे काही चांगलं असेल ते सर्व माझ्या आईचंच आहे.

भुमेश्वरीताई सातपुते खोंडे
ता. उमरेड जि.नागपूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 6 7 4 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे