जे. एस. एम. महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जे. एस. एम. महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धा संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि २०) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या विद्यापीठाच्या कोकण विभाग क्रमांक ०४ च्या योगासन स्पर्धा आयोजनाचा मान जे. एस. एम. महाविद्यालयास मिळाला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक -२१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड गौतम पाटील यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेत कोकण विभागातील एकूण १२ खेळाडू सहभागी झाले होते.
मुंबई विद्यापीठातर्फे निवड समितीचे सदस्य म्हणून मा.शशांक उपशेट्टे सहसचिव व समन्वयक कोकण विभाग, तसेच मा. रामचंद्र कदम यांनी काम पाहिले . उत्तम चंद्रकांत मांदारे, चैताली विठ्ठल पाटील, सागर रघुनाथ शिटकर, माधवी वीरेंद्र पवार, रणवीर अशोक सावंत ह्यांनी पंच म्हणून काम पाहिले.
महाविदयालयाचे क्रीडा व जिमखाना प्रमुख प्रा.डॉ.रविंद्र चिखले व सर्व क्रीडा समिती सदस्य यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन आयोजन समिती यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.



