0
4
8
2
9
4
खुल्लमखुल्ला
कसं आतलं बाहेरचं
असं जमतच नाय…
जे हाय ते कसं आमचं
अगदी खुल्लमखुल्ला
समजाचं काय ते….
समजू द्या कुणाला बी
मनात येईल ते आमी
बेधडक बोलून देतो…
चुकलं माकलं कधी तं
आपणहून माघार घेतो
खऱ्याचं खोटं आणिक
खोट्याचं खरं आमास्नी
करता बी येत नाय……
पोटात एक व्हठात एक
कदी बी जमायचं नाय
जे हाय थे खुल्लमखुल्ला
बोलल्याबिगर राहायचं नाय
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
========
0
4
8
2
9
4



