Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरभणीमराठवाडासाहित्यगंध

शस्त्र-अस्त्राची मानवंदना

नरेंद्र गंगाराम साबळे ता.गंगाखेड, जि. परभणी

0 5 2 2 6 3

शस्त्र-अस्त्राची मानवंदना

गनिमाच्या हातातली, सळई बोले सळईला…
काय सांगू गं बाई शौर्याचा तो सोहळा…!
आजू-बाजू गच्च… हिरवी विष-वली
मध्ये अभेद्य अग्नि खांबा जुंपले गं त्या विराला…!
साखळ दंड मजबूत ;अंग-अंग फासे गच्च टाकिलेत…!
देहा-वरचा नरसिंहाचा सदरा अर्धा – निम्मा फाटलेला…!
रक्ताच्या थेंबा-थेंबाने माखलेला…!
पाऊलाची पक्कड़ बाई घट्ट त्या विराची स्वराज माऊलीला…!
तीच नरसिंगला वंदन करण्या,
उंचबळीला पान्हा हो…!
गनिमाच्या हातातली तलवारीची पातही बोले…
विराच्या मुंखातील पद्मीनीला…!
स्वराजाचा हुंकार गर्जती…!
शस्त्र-शास्त्र कोठारात आता कुठे मान मला.
तुमच्या जिव्हेचे चुंबन घेते…!
गनिमाला मी धिकारीते; लेक होऊनी
तलवारीची पात बोलते…!
गनिमा मुठीतील मीठ म्हणे राजेन,
मला क्षण-भर समजा चंदन…!
अंगा-अंगा झोबेल ;होईल तुमचे
चंदन-वंदन…!
पिता माझा सिंधूराज गाईल
तुमच्या किर्तीचे गुण गाण…!
सळई बोले सळईला ,
सुर्या-चंद्रा भिडावे कसे
नात्याने पिता आसे…!
तप्त सळई आर-पार गेली
गनिमाला ती बोलू लागली
स्वराज सूर्याचं तेज कोटी सूर्य ओत-पोत…!
अरे गनिमा औरंग्या तू या
मातीत होशील भस्मी भूत.

नरेंद्र गंगाराम साबळे
ता.गंगाखेड, जि. परभणी
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 2 6 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे