Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 9 6 0 8

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट नऊ🎗🎗🎗*

*☄विषय : रक्तपात नको मानवा☄*
*🍂शनिवार : २२/ अॉगस्ट/२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*रक्तपात हा नको मानवा*

रक्तपात हा नको मानवा
स्विकारु बौद्ध तत्वज्ञान!
भीमराया ओळखून वागू
धर्म पंथ एक संविधान!!

तलवार घेऊन सोबती
जागतोस इथे कशाला!
क्षणोक्षणी भीतीने सदा
मारतोस भल्या मनाला!!

शांतता नांदायला जगी
तू माणूस हो या जीवनी!
तेव्हाच सूर्य चंद्र चांदणे
निळे नभ दिसेल धरणी!!

करुणा आचरणात कसा
आणित नाही जगताना!
सांग तयाला कसे मिळेल
त्याचे कर्म फळे मरताना!!

जीवन जगताना कोणी
नसतोच श्रेष्ठ अन् कनिष्ठ!
स्वार्थी करतात स्वार्थाने
स्वतःलाच रे स्वतः भ्रष्ट!!

अहिंसा परमो धर्म जाणा
हाच मार्ग या जगण्याचा!
सोनं चांदी पैसा अदला रे
नाही भोग तुझ्या कमाईचा!!

रडत वेड्या नंगा जन्मला
हसणे नव्हते तुझ्या ओठी !
माजून गेलास मग भूवरी
फुकटाची खाऊन तुपरोटी !!

शिकवण बुध्दाची अंगिकार
हिच मानवी उध्दारासाठी !
अष्टांग पंचशीलेला जाण तू
त्या पारमिता कल्याणासाठी !!

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि, यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

रक्तपात नको मानवा
शिकवण बुद्धाची स्मरूया
मानवतेचा कल्याणकारी
मार्ग बुद्धाचा अनुसरुया….!!

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
शत्रूलाही प्रेमाने जिंकावे
बंधूभाव रुजवून मनामधी
गुण्या गोविंदाने नांदावे…!!

द्वेष लोभ मोह माया मत्सर
करू नये कुणाचा कधी
दया क्षमा करुणा शांतीचा
मार्ग अवलंबावा जीवनामधी…!!

उच्च नीच्च जाती धर्माच्या
पाडून टाकाव्यात भिंती
मानव आपण समान सारे
नांदू देत हृदयामध्ये शांती….!!

युद्ध हे तर विनाशकारी
वैर वाढत जाईल मनात
हिंसाचार अशांतता निर्माण
होईल प्रत्येकाच्या हृदयात…!!

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

किडे, मुंगीप्रमाणे दररोज
माणसे माणसांना मारतात
मन, भावना निष्ठुर झाल्यात
स्वार्थासाठी रक्तपात करतात

नाही कुणाची मक्तेदारी इथे
सर्व आपण काळाचे पाहुणे
झडप काळाची येई जेव्हा
सर्व सोडूनअंती एकटे जाणे

कशाला हवा अती हव्यास
अमर्याद अपेक्षांचे ओझे
षड्रीपू विकार अंतरीचे
हरवते माणुसकीचे नाते

रक्तपात नको मानवा
अहिंसेचा तू मार्ग धर
कल्याण करण्या जीवनाचे
षड्रीपूंवर विजय प्राप्त कर

मानवाने मानवाशी सदा
वागावे माणुसकी धर्माने
प्रेमाने फुलते नंदनवन
नको द्वेष,मत्सर कारणाने

अष्टांग मार्ग अनुसरून
सत्कर्म करावे सतत
होणार नाही भले मानवा
विकारी वृत्ती संगे जगतं

जल,जमीन,आकाश सारे
आहे ईश्वराची अनमोल देण
हक्क सांगून त्यावर आपला
नको अंगिकारू रक्तपाती लेणं

तुझे ते तुझे,माझेही तुझे
ठेव मनी विशाल भावना
राखतो ईश्वर समतोल
नको कुणाची निर्भत्सना

*श्रीमती सुलोचना लडवे*
*जि अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*रक्तपात नको मानवा*

आर्तपणे विनविते तुजला,
तुझीच मी रे भारत माता,
अरे, रक्तपात नको मानवा,
विश्वात आता नांदो शांतता

मानव सारे एकची असती,
तरी भेदभावाची का विकृती?
धर्म, जात अन् वर्ण विसरुनी,
माणुसकीची फुलू दे प्रीती

सीमेवरती सैनिक झुंजती,
घरोघरी माय-बहिणी रडती,
युद्धाच्या या ज्वाळांमध्ये,
निष्पापांची स्वप्नेही जळती

आपसात ईर्षा जीवघेणी
नात्यांतील बंधची तुटले
आपुलकीचे भान कुठले?
प्रेमाचे झरे आटून गेले

विद्वेषाचा पेटतो वणवा
युध्दाचा अग्नी भडकता
निष्पापांचा बळीही घेतो
पृथ्वीचा टाहो ऐकू येतो?

वसुधैव कुटुम्बकम् तत्व
ध्यानी सर्वांनीच घ्यावे
मानवतेचे दीप चेतवून
मनोमनाला हो उजळावे

द्वेष-मत्सर सारे विसरावे,
प्रेमबंधांनी जग जोडावे,
शांतीचा संदेश घ्या हो हाती
विश्वबंधुत्वाचे गीत गावे

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

एकामागोमाग एक युगे आली, आणि गेली,
परिस्थिती मात्र अजूनही तशीच राहिली;
स्वरूप जरी बदलले, काळ पुढे सरला,
कलहाची धुंदी मानवाच्या मनातून नाही उतरली…

छोटी-मोठी कितीतरी युद्धे झाली,
रामायण-महाभारताची पाने रक्ताने
भिजली कलियुगातल्या दोन महायुद्धांनी तर
मानवतेचीच राखरांगोळी केली…

निसर्ग महान, अमाप त्याची माया,
मानवानेच त्याच्या कुशीत पेरल्या विनाशाच्या छाया;
अघोरी कृत्यांनी त्यालाही नमविले,
हे सारे पाहून धरणीमातेचे काळीज हेलावले…

पाण्याच्या प्रवाहापेक्षाही वेगाने
रक्ताचे पाट वाहू लागले
माणसाने माणसालाच संपवताना
मानवतेचे अस्तित्वच हरवू लागले…

“रक्तपात नको रे मानवा,”
धरणीमातेने हात जोडून सांगितले..
शस्त्र नको, द्वेष नको,
प्रेमाचे दीप मनामनांत लाव रे!

आता तरी थांब, मानवा,
अति तिथे माती व्हायला वेळ लागत नाही
देवाच्या मनात आले जर एकदा,
तर पृथ्वीचा अंत व्हायलाही वेळ लागणार नाही…

सावर स्वतःला, माणसा,
प्रेमाने जग, प्रेमाने नांद
गुण्यागोविंदाने सारे राहा,
सुख-शांतीने भरू दे प्रत्येक घर-आंगण!

रक्तपात नको मानवा,
हीच धरतीमातेची हाक आर्त
मानवतेला जपू या सारे,
आणि शांततेचा धरू या मार्ग…!

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

रक्तपात नको मानवा, बनू नकोस युद्धखोर
कापू नको कुणाचाही, अकालीच जीवनडोर..//

सारी जैवसाखळी आहे, निसर्ग नियम बद्ध
मात्र त्यात हस्तक्षेपास,का तूच कायम सिद्ध..//

इथे अव्याहत चालू आहे, उत्पत्ती अन् र्‍हास
साधला जातोय समतोल, योजना असे खास.//

जरूर आहे प्रत्येकाला, आत्मउन्नतीचा ध्यास
मात्र तुलाच मानवा, का पराकोटीचा हव्यास.//

तुझ्याइतका मतलबी , नसेल कोणताच जीव
माणूस असून माणसाचीही, येईना तुला कीव.//

वाटला आहेस तू अनेक, जाती, पाती,धर्मात
मात्र उणा पडतो आहेस, मानवतेच्या कर्मात. //

धरती, आकाश, सागरावर, हवीय तुला सत्ता
रक्तपात करून अनेकांचा,कटवू पाहतो पत्ता.//

शस्त्र अंतीम पर्याय, आधी जाण शास्त्र निती
युध्द नव्हे बुद्ध विचार, आणेल जगात शांती.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

रक्तपात नको मानवा
घोषणा युद्धाची
ही वाणी मुद्द्याची
ऐकावी बुद्धाची ॥१॥

रक्तपात नको मानवा
जीण होईल हराम
अन्नाची होईल वानवा
मुखी ठेव राम ॥२॥

तर होईल काम
शांतीने छान
गाळुन घाम
जगण्याचे ठेव भान ॥३॥

कष्टाने मिळव दाम
नको रक्तपात
नको वापरू साम
बळाने कर मात ॥४॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

जीवनात अपुल्या हवी शांतता
भाव तुम्ही अहिंसेसा फुलवा
ह्रदयी जागव तू प्रेम भावना
रक्तपात नको मानवा

ह्रदयी नको व्देष, मत्सर
मैत्री फुलवू आपण सत्वर
शुध्द भाव हा मनी जागवा
रक्तपात हा नको मानवा

साधू संत करीतात उपदेश
शांततेचा देई संदेश
करुणेचा हा भाव आगळा
रक्तपात हा नको मानवा

संस्कारांनी जीवन फुलवा
चैतन्याची ज्योत पेटवा
हर्षून जाईल जीवन अपुले
रक्तपात नको मानवा

युद्ध नको आम्हा बुध्द हवा
मत भेदला दूर ठेवा
मानवतेला जागवू आपण
रक्तपात नको मानवा

*श्री.पुरुषोत्तम वि.ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

रक्तपात नको मानवा
शांततेचे दीप लावूया
द्वेषाच्या काळ्या ढगानां
प्रेमळ शब्दाने सावरुया

जाती-धर्माचा कशास भेद
सर्वांचे रक्त आहे लाल
सुखदुःख सारे समान
का फुगवावे रागाचे गाल

रक्तपात करूनी मानवा
काय मिळते हाती
याच कार्यासाठी जन्मला का
तू मायबापाच्या पोटी

कसला मिळेल आनंद
करूनी रक्ताचा चिखल
कधी तर उपयोगी लाव
चांगल्या कार्यासाठी अक्कल

माणुसकीचा जयजयकार
सारे मिळून करूया
रक्तपाताची भाषा न करता
प्रेमाने जग जिंकूया

*कुशल गो डरंगे अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 6 0 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे