माजी लष्करप्रमुख जनरल वैद्य यांची पुण्यतिथी शासकीय इतमामाने साजरी होईल;आदिती तटकरे
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
माजी लष्करप्रमुख जनरल वैद्य यांची पुण्यतिथी शासकीय इतमामाने साजरी होईल;आदिती तटकरे
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग (दि १५) : भारताचे माजी लष्करप्रमुख व अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुढील वर्षी (२०२६ ) जन्मशताब्दी आहे. शीख अतिरेक्यांची चळवळष नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी सुवर्ण मदिरात ब्ल्यू आॕपरेशन करून भारतातील फुटीरता दूर केली. पण ते दुर्दव्याने अतिरेक्यांकडून शहिद झाले. हे त्यांचे राष्ट्रीय काम शासन केव्हाच विसरणार नाही.
त्यांची पुढील पुण्यतिथी १० आॕगष्ट २०२६ रोजी आहे . तत्पूर्वी त्यांची पुण्यतिथी अलिबाग येथे शासकीय इतमामाने साजरी होण्यासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून जरुर प्रयत्न करीन ” असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री तथा श्रीवर्धनच्या आमदार आदितीताई तटकरे यांनी दिले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे शासकीय ध्वजारोहण नामदार तटकरे यांच्याहस्ते झाले. त्याचवैळी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी भारताचे माजी लष्करप्रमुख “शाहिद” वैद्य यांची पुण्यतिथी शासकीय इतमामाने साजरी व्हावी असे निवेदन दिल्यानंतर मंत्री महोदया बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळै , पोलिस अधिक्षक आंचल दलाल , जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भोसले , राष्ट्रवादी काॕग्रेस (अजित पवार गट) नेते अॕड प्रवीण ठाकूर , हर्षद पाटील , ललित शेट्ये , चंद्रहास मगर , दिलीप देवळेकर इ. उपस्थित होते .





