Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरराजकियविदर्भ

‘असे मला वाटते..कारण मी निवडणूक लढण्यास तयार आहे.

0 4 8 2 9 4

‘असे मला वाटते..कारण मी निवडणूक लढण्यास तयार आहे.

नागपूर/ वाडी: जनतेमधून नगराध्यक्षाची निवडणूक होत असल्यास व जनतेचा आग्रह व इच्छा असल्यास मी अनील पारखी निवडणूक लढण्यास तयार आहे

कारण———-नगराध्यक्षाची निवडणूक जनतेमधून झाल्यास घोड़ेबाजारावर लगाम लागू शकतो, अंकुश लागू शकतो! व यासाठीच मी अनील पारखी माझ्या पदरचा वा कोणाचाही पैसा खर्च न करता नगराध्यक्षाची निवडणूक लढू इच्छितो!! कारण माझा पिंडच समाज सेवेचा आहे! मला प्रामाणिकपणे समाजाची सेवा करायी आहे!

माझा जनता-जनार्दनावर पूर्ण विश्वास आहे! माझा शोषण थांबविण्याचा निर्धार आहे! शोषण व अन्यायाची मला चीड आहे! भ्रष्टाचारला प्रतिबंध करायचा आहे. अन्यायाविरुध्द मला सतत लढा द्यायचा आहे!

शोषितांना न्याय देण्याचे माझे स्वप्न आहे व मी अनील पारखी त्याच मार्गाने काम करीत आहे हे वाडीतील व नागपुर मधील जनतेला माहीत आहे!

जनतेला आव्हान करतो की तुम्हास नि:पक्ष, नि:स्वार्थ सेवक हवा असेल तर माझ्यावर अनील पारखी वर एकदा विश्वास ठेऊन बघा!!!

आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पानी, रोड, नाल्या या व इतर सर्व समस्या मार्गी लावण्या मी कटिबद्ध असेन! सर्व बाबींवर पूर्ण लक्ष केंद्रीत करीन व सुधारणा करीन!!! मी ठामपणे हमी देत आहे!
सधारणत:खालील कामे प्राधान्याने करण्याचा माझा मानस आहे – – – – –

1,) सफाई व कंत्राटी कामगारांच्या समस्या निवारण करणे व सर्व सोई सुविधा उपलब्ध करणे

2 )जनते कडून जमा होणा-या कराचे पारदर्शी अॉडीट करुन हिशोब जनतेला सादर केला जाईल

3) कोणत्याही अधिकारी वा कर्मचारी यांनी अफरातफर वा कामचुकारपणा केल्यास नियमानुसार शिक्षेस पात्र असेल

4) जनतेच्या गरजेनुसार व व त्यांच्या इच्छेनुसार कामे करण्याचा प्रयत्न राहील!

5 )वाडीतील शौचालयाची दुरुस्ती व सुशोभित नव शौचालयाची निर्मीती केल्या जाईल!

6) शुध्द पिण्याजोगे पाणी उपलब्ध करुन दिल्या जाईल!

7) वाडीत स्वतंत्र भाजीपाला मार्केटकरीता प्रयत्न

8 )विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालयाची निर्मिती करण्याचा मानस राहील!

9 )आरोग्य संवर्धनाकरीता सरकारी दवाखान्याकरीता पाठपुरावा करीन!

10) स्मशान भुमीची स्वच्छता व सौंदर्यीकरण!

11) माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यास त्वरीत राजीनामा देऊन राजकारण संन्यास घेईन!!! पण——-पण समाजसेवा सोडणार नाही!! माझे समाजसेवेचे कार्य तहहयात सुरु राहील!!!

12 )पावसाच्या पाण्याचा निचरा व रोड दुरुस्तीची कामे प्राधान्याने केल्या जातील व खड्डेमुक्त वाडी करण्याचा माझा मानस आहे!!!

13 )सुंदर वाडीसाठी ज्या काही चांगल्या व लोकहिताच्या योजना असतील त्या सर्व योजनांची अंमलबजावनी करण्याची मी अनील पारखी हमी देत आहे!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे