अलिबागई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
कष्टाची भाकरी
0
4
8
2
8
7
कष्टाची भाकरी
करावी मनापासून आपण
स्विकारली जी चाकरी
बहु गोड लागेल मित्रा
तुला ही कष्टाची भाकरी
आनंदाने सेवाव्रती राहून
मार्ग नेकीचा सदा धरावा
जरी अडसर आले मार्गी
मंत्र सत्कर्माचा स्मरावा
कष्टाविना फळ ते नव्हे
नेहमी ध्यानी असू द्यावे
कार्य तुझे हे अद्वितीय
जे किर्तीरूपे तरी उरावे
कष्टाला पर्याय तो नाही
स्वानंदाची असावी वारी
फळे उत्तमची ती चाखाया
गोड ही कष्टाची भाकरी
या भाकरीची नसे तुलना
घ्यावे जाणूनी तिचे मोल
कष्टाशिवाय ऐक रे मित्रा
सारे जीवनच ठरते फोल
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
0
4
8
2
8
7



