
0
6
7
7
8
6
ताई
एकदा काय झाले
ताईला पाहायला पाहुणे आले
ताई म्हणाली, मला आहे शिकायचं
आई म्हणाली, ते लग्नानंतर करायचं
ताई लागली रडायला
आई लागली समजवायला
इतक्यात आले बाबा
आई म्हणाली, आत्ता तुम्हीच समजावून सांगा
ताईच्या पाठीवर बाबांचा हात
आत्ताच नको लग्नाची बात
वेडाबाई असं रडायचं नाही,
आईला असते नेहमीच घाई
पहिल्यांदा आपण खूप खूप शिकायचं
स्वतःच्या पायावर उभं आपण व्हायचं
शब्द ऐकून बाबांचे ताई खुश झाली
आनंदाने चिंगी उड्या मारू लागली.
भुमेश्वरीताई सातपुते- खोंडे
ता उमरेड जि.नागपूर
0
6
7
7
8
6



