Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननांदेडमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

निसर्गरम्य श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव

0 4 8 2 8 6

निसर्गरम्य श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान

अचलबेट हे देवस्थान धाराशिव जिल्ह्यांमध्ये आहे. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील सीमेलगत वसलेले आहे. अगत्य ऋषींचे वास्तव या ठिकाणी होतें असे सांगितले जात असे. सदगुरु काशीनाथ महाराज वास्तव करुन तपचर्या केली असे मानले जाते…आधुनिक काळात जवळपास चाळीस पन्नास वर्षांपासून सद्गुरू उज्वलानंद बाबा या ठिकाणी आले व राहीले. त्यामुळे याला श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान असे नांव पडले.

श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पासून जवळपास चाळीस किलोमीटर परिसरात अनेक गोरं गरीब मजूरदार लोकांना वाडी वस्तीतील लोकांना परमार्थची आजिबात आवडत नव्हती .. सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने येथे अनेक मंदिरे आहेत, भव्य भक्तनिवास, प्रसादालय, वाचनालय आहे… गरीब मुलांना शिक्षणासाठी हे उपलब्ध आहे… सर्व बाजूंनी प्रचंड झाडी असल्यामुळे येथील निसर्ग समृध्द बनला आहे.. विविध विकास कामे येथे सूरू आहेत… अशा या निसर्गरम्य ठिकाणाला देशातील बऱ्याच संत महात्मानी ,महंतांनी भाविक भक्तांनी भेट दिली आहे.दररोज पाठ, दोन वेळा आरती, दर गुरुवारी आरतीला जवळपास हजार दोन हजार भाविक भक्त दर्शन घेऊन सकाळचा महाप्रसाद म्हणजे प्रभूचे साक्षात दर्शन घेतात.

दररोज दुपारी आणि रात्री आठ वाजता महाप्रसाद असतो.धार्मिक शिक्षणाबरोबर येथे संस्काराचे धडे दिले जाते.. तसेच वृद्धाश्रम सुध्दा मोफत आहे…हे येथील विशेष आहे…माझे गुरू बंधू ह.भ.प.हरी गुरुजी लवटे, ह.भ.प.नरसिंग लवटे तसेच मलाही शिक्षक म्हणून सद्गुरू उज्वलानंद महाराजांनीच नौकरी लावली.बऱ्याच जणांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय सुध्दा सुरू करायला आशिर्वाद दिले. ह.भ.प.हरी गुरुजीचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी कीर्तन सेवा होते त्या पेक्षा वर्षाला दिपावलीच्या अगोदर या दोनशे गावातील भाविक भक्तांना आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंढरपूरला राऊळात कीर्तन सेवेच्या निमित्ताने दीड ते दोन हजार भाविक भक्तांना दर्शन होते.ती परंपरा आजही गेली बारा वर्षापासून ह.भ.प.हरी गुरुजी अखंडित पणे सुरू ठेवले आहेत.

आदरणीय ह.भ.प. हरी गुरुजीनी एक पैशाचीही अपेक्षा न ठेवता सर्वच रक्कम श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान कडे जमा करतात. येथून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या त्याचा उपयोग आमच्या जीवनात प्रगती करण्यासाठीं होणार आहे… सर्वांनी एकदा या पवित्र व समृध्द ठिकाणाला भेट द्यावी असे आवाहन आम्हीं करत आहोत. लोक म्हणतात, जर हाताच्या रेषा अपूर्ण असेल तर भाग्य चांगले नसते परंतु मी म्हणतो की, डोक्यावर हात असेल गुरू चा तर रेषांची काय जरूरत. गुरुच्या चरण धुळीचा फक्त एक कणही भक्ताला असंख्य पापांपासून मुक्ती देतो, सगळ्या वासना नष्ट होतात. गुरु जिथे राहतात तीच काशी आणि त्यांच्या चरणांचे तीर्थ म्हणजे गंगा समजावी…!

माझी देवपूजा पाय तुमचे गुरुराया
‘काळजी घ्या हा शब्द
काळजातुन निघतो.
“आपल्या” “परक्याची” जाण करून देतो.
कोणी तरी आहे आपली काळजी करणारं
या भावनांनी जीव आनंदतो, “सुखावतो”
काळजी घ्या या शब्दातच
“आपलेपणा” दरवळतो.!

आई प्रमाणे काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे आपले गुरू…. सद्गुरू उज्वलानंद माऊली

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान…
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरुराया …
गुरू थोपटतो पाठ
गुरु दाखवितो वाट
मार्गदर्शन घेता गुरुचे
जीवनी ना लागे नाट.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे