
0
5
1
7
9
5
वड
वडाचे झाड
हिरवेगार
लांबच लांब
पारंब्या फार
वडाच्या सावलीत
आम्ही खेळतो
वडाच्या पारंब्याला
आम्ही झुलतो
वडाच्या पारावर
आजोबा बसतात
निवांतपणे
गप्पा मारतात
वडाच्या झाडाला
लाल लाल फळ
फळ खायला जमतो
पक्षांचा मेळ
वडाच्या झाडाभोवती
फेर धरू
फेर धरून
नाच करू
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड, जि. नागपूर
0
5
1
7
9
5



