ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीमहाराष्ट्रसाहित्यगंध
भावदर्शन
सविता पाटील ठाकरे सिलवासा, दादरा नगर हवेली

0
5
4
7
2
3
भावदर्शन
अंतर्मनाच्या गाभाऱ्यात
आज डोकावून पाहीले
कितीतरी त्या भावनांनी
जीवनाचे गाणे साकारले
मनाच्या निःशब्द लहरींनी
स्पर्शीले हळुवार जीवाला
आठवणींच्या मंद सुगंधांने
भरीले क्षणांच्या शिवाला
नजरेत दाटे अनाम छाया
ओघळती अश्रूंची कहाणी
स्पर्श न होता जाणवते जे
तीच खरी अंतरीची वाणी
कधी आनंदाचे मोती दाटले
दुःखाचेही ढग दाटून आले
भावनांच्या रंगीबेरंगी छटांनी
जीवनचित्र हे सुंदर रंगविले
भावदर्शन च्या या वाटेवर
उलगडले अंतरंगाचे रंग
शब्द हरवले भावनांमध्ये
नभासवे होई मनाचा संग..
सविता पाटील ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
========
0
5
4
7
2
3



