आदर्श प्राथमिक व वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
आदर्श प्राथमिक व वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नंदूरबार: (दि ३ जाने) पाडळदा येथील आदर्श प्राथमिक आणि वल्लभ विदयामंदिर यांचे संयुक्त विद्यमाने आनंददायी शनिवारचे औचित्य साधून बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री दत्तात्रय सोमजी पाटील यांचे हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक आंबालाल चौधरी , पर्यवेक्षक गणेश पाटील ,आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक योगेश सोनार उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर वृंद यांचे सहकार्य लाभले. बाल आनंद मेळाव्यास माजी मुख्याध्यापक विद्यमान संचालक अशोक पाटील यांनी भेट दिली व पाहणी केली. यावेळी तालुका विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कारही करण्यात आला.
बाल आनंद मेळाव्यास विद्यार्थ्यांचे एकुण ३६ स्टाॅल लावण्यात आले .बाल आनंद मेळाव्यात बासुंदी, पोंगेबटाटे, पोहे, मेळ, भजी, पाणीपुरी, पोहे, चिवडा, फुटाणे, इडली, चनाभेळ, आलुपोंगा, मंच्युरीअन,मसाला पापड, खमणी, कुरकुरे, काॅफी, कचोरी,खस्तापुरी, केळीचिप्स, उसळ, गेमझोन आदी विविध प्रकारचे स्टाॅल लावण्यात आले.
बालमेळाव्यातून ५९२४ रूपयाची उलाडाल झाली. बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य शिकण्यासाठी तसेच ग्राहक विक्रेता संवाद कौशल्य,खरेदी विक्री, नफा तोटा या आर्थिक संकल्पना समजण्यासाठी पूरक उपक्रम असल्याचे पर्यवेक्षक गणेश पाटील यांनी माहिती दिली.
चतूर पाटील, महेंद्र पाटील , अरविंद पटेल, धर्मेंद्र कुवर ,भरत पाटील, भुपेंद्र पाकळे, तुषार पाटील ,अमृत पाटील, दिव्या पाटील , मनिषा दाभाडे,अश्विनी पाटील, रोहिणी सुर्यवंशी,दामिनी शिंदे, सविता पाटील,सुनंदा पाटील , अमोल पाटील , नलिनी देवरे आदी शिक्षकवृंद तसेच पुष्कर पाटील, विनोद गोसावी , योगेश पाडवी, नितीन न्हावी शिक्षकेतर वृदांचे सहकार्य लाभले.



