ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनगोंदियाविदर्भसाहित्यगंध
सुखाच्या वाटा
तारका रुखमोडे अर्जुनी\मोर जि.गोंदिया
0
4
8
2
9
7
सुखाच्या वाटा
किती ग बांधतेस…
पारंपारिकतेचं स्वत:भोवती जोखड
किती गं भाजतेस…
तनामनाची संसार ओझ्याखाली भाकर
कितीदा शिवतेस …
स्वतःचं असह्य कळेनी फाटलेलं हृदय
पदराखाली दडवतेयस नभागत दु:खं..
गुदमरतोय ना गं श्वास…
होतोय ना जीवाचा तडफडाट
मग…मग सोड ना हा आवळलेला पाश
फेकून दे बंधनरूपी लक्तरांचा गळफास
भरना ओंजळीत स्वत्वाच्या बहरणाऱ्या लाटा
शोध ना केवळ तुजसाठी स्व सुखाच्या वाटा
तारका रुखमोडे
अर्जुनी\मोर जि.गोंदिया
=========
0
4
8
2
9
7



