चुका सुधारण्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक”; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्य त्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
“चुका सुधारण्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक”; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्य त्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
अखेरचे येतील माझ्या, हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती
आज प्रकर्षानं या गीताची आठवण आली. चुका हा शब्द अगदी बालपणापासून आप ल्याला परिचित आहे. चूक म्हणजे काय हे कळायला लागल्यापासून आपल्या हातून अनेक चुका होत असत. खोटं बोलणं, उलट बोलणं, कधी निरोप न सांगणं, आपल्यापेक्षा अशक्त मुलाची खोड काढणं, मारा मारी करणं. अर्थात या चुकांसाठी वेळो वेळी आई वडिलांकडून धपाटा, रागावणे अशा शिक्षा मिळाल्या आहेत. पण साधा रणपणे आई सौम्य शब्दांत चूक समजून द्यायची. आई च्या कोर्टात सौम्य शिक्षा किंवा माफी मिळायची.
जो चुकतो तो माणूस असं आपण सहजी म्हणून जातो. पण या चुकांचं प्रमाण वाढू लागलं तर, ते चिंताजनक असतं. आईवडील एकवेळ आपल्या मुलांना माफ करतात. पण जगात तसं नसतं.
नैतिकतेच्या दृष्टीनं काही नियम आहेत. त्यांचं पालन केलं पाहिजे. पण सध्या ही नैतिकता पायदळी तुडवलेली सर्रास दिसते. जगताना स्वार्थी दृष्टीकोन बाळगल्यानं सतत चुका होतात.एकमेकांची मनं न जपल्यानं वाढते घटस्फोट, वृध्दाश्रमांची वाढती संख्या, पती पत्नीतील विसंवादामुळं मुलांवर संस्कार न होणं, स्वकर्तव्यांकडे पाठ फिरवणं,देश हिताचा विचार न करणं या चुका होतच आहेत. राजकीय नेते स्वार्थलोलुप झाले आहेत. समाजहिताची तळमळ दिसत नाही. सत्तेसाठी राजकारण केलं जातं. स्वार्थाच्या या बाजारात सत्यच एकाकी पडताना दिसतं.
पृथ्वी ही क्षमाशील आहे. तसाच निसर्ग ही क्षमाशीलच आहे. पण माणूस बेसुमार चुका करत आहे. वारेमाप वृक्षतोड, प्रदूषणाला हातभार लावणं, जंगलांचा पर्यायानं निसर्ग साखळीचा नाश करणं. मग या चुकांचे दुष्परिणाम जसे कि, अवर्षण अतिवृष्टी, पर्यावरण असंतुल न, महापूर, भूकंप, भूस्खलन हे भोगावे लागत आहेत. आपल्याला जर खरंच आपल्या अवतीभवती शांतता, समृध्दी हवी असेल तर प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
आपल्या या शिलेदार समूहाचा विचार केला तर आपले आदरणीय राहुल सर आपल्या सर्वांसाठी, माय मराठीच्या संवर्धनासाठी सातत्यानं प्रयत्नशील अस तात. पण वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सूचना आपण वाचतो का? त्याला प्रतिसाद देतो का? सन्मानपत्रासाठी, सर्वोत्कृष्ट रचनेच्या पोस्टरसाठी फोटो पाठवतो का? याचा आपण सर्वांनी विचार करून आपल्या चुका सुधाराव्या अशी कळकळीची विनंती मला करावी वाटते. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आपल्या राहुल सरांनी दिलेला ‘नुसत्या चुका’ हा विषय अंतर्मुख करणारा आहे. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





