0
4
8
2
8
6
आमचे सहजीवन
दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी
सौ.ज्योती ज्ञानेश्वर माशाळकर
यांच्या सोबतच्या वैवाहिक जीवनाला
आज २५ वर्षे पूर्ण झाली.
या पंचवीस वर्षांच्या प्रवासात
तू मला अविरत साथ दिलीस,
प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक
माझ्या पाठीशी उभी राहिलीस.
कशाचीही अपेक्षा न करता,
ज्यात आहे त्यात समाधान मानून,
सुख-दुःखात माझ्या खांद्याला खांदा लावून
आजपर्यंत तू ठाम उभी राहिलीस.
या निःस्वार्थ प्रेमाबद्दल,
त्यागाबद्दल आणि समजूतदार साथीसाठी
मी तुझा मनापासून आभारी आहे.
जशी आजपर्यंत माझ्या आयुष्याची
मजबूत साथ झालीस,
तशीच पुढेही आयुष्यभर
माझ्या सोबत उभी राहावीस
हीच सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या
चरणी नम्र प्रार्थना.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा, धाराशिव
0
4
8
2
8
6



