0
1
9
3
1
3
बहरलं हिरवं रान
बहरलं हिरवं रान माझं
काळ्या आईची माया
पीक उभारलं जोमाने
ही निसर्गाची किमया …१
ऊभ्या शेतात राबलो
झालं कष्टाचं चीज
आभाळमायेच्या कृपेनं
आज अंकुरलं बीज …२
पोशिंदा मी जगाचा
नाव माझं शेतकरी
या जगाच्या पोटासाठी
दान माझे भाकरी …३
निळ्या अंबरात येती
काळे ढग हे दाटून
हिरवं सपान माझं
साकार होतसे नटून …४
बाकी काही नको देवा
फुलावं असंच हिरवं रान
डोळ्यांत माझ्या राहू दे
माझंच हिरवं सपान …५
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर जि.पुणे
======
0
1
9
3
1
3