“आभाराची शब्दफुले”; स्वाती मराडे
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
“आभाराची शब्दफुले”; स्वाती मराडे
तुमचा फोटो पाठवा, हा जादुई संदेश येतो
नि दिवस कसा आनंदात चिंब करून जातो
या आठवड्यात मराठीचे शिलेदार समूहामुळे ही पर्वणी तीन वेळा मिळाली. ‘सुट्टीची मजा’ हे सर्वोत्कृष्ट बालकाव्य, ‘गजगामिनी’ व ‘आर्जव’ या रचनेसाठीचे सर्वोत्कृष्ट काव्यरचनेचे पोस्टर समूहात झळकले व सर्वच समूहातून अभिनंदन वर्षाव झाला.
काल लिहिलेले काव्य मी स्टेटसला टाकले तेव्हाच आलेल्या प्रतिक्रिया वाचून आपण काहीतरी चांगले लिहिलेय याचा मनोमन आनंद झालेला. यावर सोनेरी कळस चढवला तो आजच्या सर्वोत्कृष्ट काव्यरचना पोस्टरने. कोणतंही बक्षीस जेव्हा मिळते तेव्हा होणारा आनंद हा शब्दातीतच असतो नाही का? या आनंदसरींची बरसात करणारे कार्यकुशल समूहप्रमुख आदरणीय राहुलदादा. लेखणीचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी त्यांच्याकडून हे बक्षीसरूपी जे प्रोत्साहन मिळते त्यासाठी त्यांची मी नेहमीच ऋणी. मौलिक साथ देणा-या आ. पल्लवीताई, ऊर्जास्त्रोत प्रिय सवूताई, मार्गदर्शक आ. वैशालीताई, आ. वृंदाताई, प्रिय तारकाताई, प्रिय शर्मिलाताई, प्रिय प्रतिमाताई, आ. उरकुडे सर, आ. अशोकदादा, आ. संग्रामदादा, प्रेरणास्त्रोत आ. विष्णूदादा आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
शुभेच्छा दरवळ मनात पोहचला
मीही गुंफला शब्दसुमनांचा हार प्रेरणा, ऊर्जा, प्रोत्साहन.. मिळे येथे यासाठी मनापासून आभार.. आभार..आभार..! समूहातील प्रेरणा देणारे सर्व ताई, दादा.. आपणा सर्वांच्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार व मनापासून आभार. आपण सर्वच लिहायला प्रेरित करता.
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



