
0
4
0
9
0
3
महाप्रलय
धरती माय रुसली फुगून बसली
क्षणात कित्येकांना गिळून बसली
पर्यावरणाचा ढासळला आहेआता तोल
मानवाचा जीवन झालंय मातीमोल
वेगवेगळ्या नदीला आला महापूर
देशात जिकडे तिकडे दुःखाचा सूर
देशात महापुराने केला चकनाचूर
मरून राहीली जनता देशात भरपूर
बोचत आहे दुःख सांगू आता कुणाला
होतं नव्हतं सर्व बळी पडलं या पुराला
कितीतरी दिवसापासून जमवत होतो धन
क्षणात आला काळ सर्व गेलंआता हरपून
मानवांनो सर्वांनी समजावी आपली नातं
सर्वांनी झटावे देशासाठी भाऊ अहो रातं
हिंदू असो मुसलमान आहे एक नातं
दादा हो सर्वांसोबत ठेवा मानवाच नात
शाम राठोड
कारंजा लाड जिल्हा वाशिम
0
4
0
9
0
3





