
0
6
3
9
6
2
शब्द सुरभी
शब्द सुरभी दरवळते
कवितेच्या अर्थपूर्ण पानात
प्रेमळ शब्द ऐकता
फुले उमलतात मनात….
सुगंध शब्दांना असतो
मनाला आनंद देणारा
एक शब्द आधार देणारा
एक शब्द घाव देणारा….
कडू शब्द टाळावे
गोड शब्द बोलावे
शब्दांनीच माणसे नाते
स्नेहपूर्ण जातात जोडले…
शब्द हे शस्त्र असतं
जपून सदा वापरावे
शब्द सुवर्ण अनमोल
वातावरणात चैतन्य निर्मिते….
आईच्या शब्दात माया
बापाच्या शब्दात धीर
गुरुच्या शब्दात ज्ञान
मित्राच्या शब्दात आधार…
यमक अलंकारांनी शब्दांना
सुंदर येतो आकार
मराठी भाषा लाभले वरदान
साहित्याची जपावी बहार…
सुनीता पाटील
जिल्हा अहिल्यानगर
=======
0
6
3
9
6
2



