Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

जे. एस. एम. महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत रायगड जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 9 8 7 7

जे. एस. एम. महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत रायगड जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग, दि. २४ ऑगस्ट २०२६ :
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि जनता शिक्षण मंडळाचे जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ अंतर्गत रायगड जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील करिअर कट्टा समन्वयक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यशाळेस उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन करिअर कट्टाचे मुख्य प्रवर्तक प्राचार्य डॉ. लहूपंचांग यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री भूषण कोळेकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे, करिअर कट्टाचे विभागीय समन्वयक डॉ. बबन सिंगारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड, करिअर कट्टा समन्वयक डॉ. पी. ए. चाटे तसेच विविध महाविद्यालयांचे करिअर कट्टा समन्वयक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. गौतम पाटील यांनी या कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या व सांगितले कि अशा कार्यशाळेमुळे विदयार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअर संधीची माहिती मिळते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. बबन सिंगारे यांनी करिअर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बदलत्या रोजगारविश्वाची ओळख करून देणे, त्यांच्या क्षमता व आवडीनुसार योग्य करिअरची दिशा निश्चित करणे आणि आवश्यक कौशल्यविकासाला चालना देणे या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.

यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांनी ‘बदलत्या काळातील करिअरच्या संधी आणि कौशल्यविकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर विचार करून नव्या तंत्रज्ञानाच्या युगातील रोजगार व व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्याचे आवाहन केले. “आजच्या काळात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून, पदवीसोबत आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) श्री. भूषण कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेची नवी दृष्टी देत व्यवसायाच्या संधी, आर्थिक नियोजन, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि उपलब्ध साधनसंपत्तीचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन केले. नोकरीच्या संधींबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडेही विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे त्यांनी सांगितले.

“करिअरची योग्य दिशा म्हणजे उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी” हा कार्यशाळेचा प्रमुख संदेश ठरला. विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवड, कौशल्ये आणि उपलब्ध करिअरच्या संधी यांचा योग्य मेळ साधणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कपिल कुलकर्णी यांनी केले तर डॉ. सुनील ठोकळे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी करिअर कट्टा संसद मुख्यमंत्री कु. संयोगी नाईक हिनेही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यशाळेमुळे रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील करिअर कट्टा समन्वयकांना करिअर मॅपिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक दिशा मिळाली. करिअरचे मार्गदर्शन, उद्योजकतेची नवी दृष्टी आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीमुळे ही कार्यशाळा विद्यार्थी व समन्वयकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 8 7 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे