
0
4
8
2
8
4
दुनियादारी
दुनिया रंग बेरंगी
येथे रीत असे न्यारी
क्षणा क्षणाला बदलती रंग
हुशारीची दुनियादारी
जग हे सुंदर
जरी दिसे ही
येथे नसे कुणाला पर्वा
मुर्दाडांची दुनिया
कुट नितीने चाले व्यवहार
पर्वा नसे सुख दु:खाची
भुकेने व्याकूळ तडफडत असे
मुर्वत नसे येथे कुणाची
कष्ट करीती रात्रंदिन
ऊन पाऊस झेलून घेती
कष्ट कर्यांचे करीती शोषण
दुनियादारीची येई अनुभूती
उंच भरारी घेते कुणी
पंख तयांचे छाटत असे
या दुनियेची रीत निराळी
दुनियादारी कळत नसे
ज्यांना म्हणतो आपण मित्र
तोच घाव करीत असे
कोण आपला? कोण परका ?
दुनियादारीत फसत असे
या दुनियेत राहू सजग
कोल्हे लांडगे घेऊ हेरून
त्यापासून राहू दूर
घेऊ दुनियादारीत रंग भरुन
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
0
4
8
2
8
4



