
0
4
0
9
0
3
फुटलेले ढग
फुटलेले ढग काळे
पाहून वाटते भीती
सिंहासारखी गर्जना
ढग करतात किती….!!
रागात धावली वीज
ओरडली कड कड
गडगड नि कडकड
होईना झोपही धड…!!
जिकडे तिकडे दिसे
समुद्रासारखे पाणी
चला म्हणू आपण
जा रे पावसा गाणी…!!
कळत नाही का रे?
काळ्या ढगा तुला
पाडतोस पाऊस
खेळता येईना मला…!!
रपरप टपटप तुझं
बंद कर रे कायम
संपला पावसाळा
ध्यानात ठेव नियम…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
4
0
9
0
3





