ई-पेपरकवितानागपूरनांदेडसाहित्यगंध
भाकरीच्या शोधासाठी
प्रकाश पुंडलिक गोधने सचोटी ता. कंधार जि. नांदेड
0
4
8
2
9
7
भाकरीच्या शोधासाठी
भाकरीच्या शोधासाठी
मी गाव सोडून आलो
अबोल झाली मातीची घरे
मी त्यांना परका झालो
गावाकडची माय माती
पाऊलवाटा सोडून आलो
बालपणीच्या आठवणींना
सोबत उरात घेऊन आलो
देऊळ पार ओटा झाड
ती सावली सोडून आलो
जीव लावणाऱ्या माणसांना
परतीचे आश्वासन देऊन आलो
माय बाबा आजी आजोबा
माती चिखलात मोठा झालो
मित्र मैत्रिणी जत्रा सनवार
गावाच्या वेशीवर ठेवून आलो
गळके छप्पर चुल माती
सावल्यांना गुज सांगून आलो
दबके पाऊल जड अंतकरणाने
जीव अड्याला टांगून आलो
प्रकाश पुंडलिक गोधने
सचोटी ता. कंधार जि. नांदेड
0
4
8
2
9
7



