
0
4
8
2
9
0
नारळी पौर्णिमा
सण आलाय हो
आला आलाय हो
नारळी पौर्णिमा
क्षण सुखाचे देण्या
नारळी पौर्णिमा…
समुद्राच्या पाण्यावर
चालू लागल्या होड्या
पाय लाटांवर ठेवून
दिसू लागल्या जोड्या…
माई औक्षण करते
मनी आनंद ठेवून
दान सौख्याचे मागते
दर्यात नारळ सोडून…
सागराच्या पोटामध्ये
आहे निसर्गाचे धन
तीरावरच्या जीवनाचे
तोच जपतो मनं…
आषाढात खवळतो
त्याचा वेगळा महिमा
होते कामाची सुरुवात
सण नारळी पौर्णिमा
आला नारळी पौर्णिमा….
आशा कोवे गेडाम
वणी जि.यवतमाळ
0
4
8
2
9
0



