0
4
8
2
9
7
शब्दव्यूह
देह अंतर्बाह्य झिजला
भेदण्यास हे चक्रव्यूह
गुंतलो प्रवासात शब्दांच्या
मज आव्हान शब्दव्यूह
शब्दांनीच मांडला खेळ
आज अर्थवाही जीवनाचा
अडकलो शब्दजंजाळात
मी शोध घेतो प्राक्तनाचा
शब्द झालेत सोबती सदा
माझ्या साहित्य प्रवासाचे
जडले अनामिक नाते माझे
ऋण अमौलिक तयांचे
मज गवसले शब्द धन
बनले माझा काव्यप्रकाश
बहरल्या काव्यपंक्ती सदा
झाले ठेंगणे आकाश
हे शब्दव्यूह देईल विश्वास
माझ्या अबोल भावनेला
वरदान शब्द प्रभुत्वाचे लाभो
माझ्या अजोड लेखणीला
गुंफतो शब्दांना आता
पेरतो नवनिर्मितीचे बीज
अर्थ प्रवाही दान देता
होईल साहित्यिक चीज
हे शब्दव्यूह भेदून अखंड
साकारले माझे काव्यांगण
झाले सार्थक साहित्य प्रांती
देता आदरे शब्दांना अलिंगन
पांडुरंग एकनाथ घोलप
कर्जत,जि. रायगड
0
4
8
2
9
7



