0
4
8
2
9
0
भरली ओंजळ सुखाची
धन्य झाला जन्म अवघा
भरली ओंजळ सुखाची
आनंदाला उधाण आले
झाली होरपळ दुःखाची
निराशेचे मळभ निमाले
आशेला लाभले नवे पंख
अमृतासमान झाले आयुष्य
शरण आला विषारी डंख
अनपेक्षित घटनांचा नाही दर्प
घडले अपेक्षित सारे काही
वांछिले जे आजवर मनी
झुकले सारे माझ्या पायी
सुखासीन झाले आयुष्य
दुःखाचा लवलेश नाही
आयुष्य परीक्षा अनुत्तीर्ण
उरला अभिशाप नाही
सुखाच्या ओंजळीत आज
सारे काही अवचित विसावले
सोने झाले जीवनाचे खरे
अंतीम समयाचे भय दुरावले
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे
=======
0
4
8
2
9
0



