
0
5
9
0
3
4
माझी पाककला
मक्याचे पौष्टिक कटलेट
साहित्य: हिरवी मिरची, लसूण, तीळ, मक्याचे दाणे तीन वाट्या नाचणीचे पीठ एक वाटी, रवा एक वाटी, ज्वारीचे पीठ एक वाटी, हळद, हिंग, मीठ, कोथिंबीर
कृती: प्रथम मक्याचे दाणे मिक्सरमधून ओबडधोबड करून घ्यावेत. समजा पाणी सुटले असेल तर ते पाणी काढून घ्यावे. त्यातच हिरवी मिरची आणि लसूण आपल्या आवडीप्रमाणे मिक्सरमधून काढून घ्यावे.
आता ह्या मिश्रणामध्ये सर्व पिठे, रवा, मीठ, कोथींबीर बारीक करून मिश्रण एकजीव करून मळावे. नंतर त्याचे वड्यासारखे चपटे गोल करून मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावेत. मस्त टेस्टी, कुरकुरीत लागतात. कटलेट बरोबर दही, सॉस किंवा आपल्याला हवी ती चटणी घ्यावी.
वसुधा नाईक
धनकवडी, जि.पुणे
============
0
5
9
0
3
4



