जलसंपत्ती
जल म्हणजे पाणी. निसर्गातील या संपत्तीचा आपण योग्य वापर केला पाहिजे. पावसाचे पाणी साठवून आपल्याला, शहराला पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याचा आपण योग्य वापर केला नाही तर दुष्काळी अवस्थाआपण ओढवून घेऊ. आहे त्याच पाण्याचा योग्य वापर करावा. परवाच मी एका शंकर मंदिरात पाया पडायला गेले होते. तिथे मी पाहिलं अनेक लोक तांब्या भरून जलाभिषेक करत होते. जलाभिषेक करावा मी नाही, म्हणत नाही. पण तसे पाहता हे पाणी वाया जाते.
निसर्गातलीच फुल देवाला वाहिली की मन प्रसन्न होते. देव प्रसन्न दिसायला लागतात. सकाळी ब्राह्मण येऊन छान पूजा करतात. मला फक्त म्हणायचं आहे की पाण्याचा आणि दुधाचा वापर योग्य तो करावा. या देवदर्शनाला मी गेले असता त्याच ठिकाणी आणखी एक दृश्य मी पाहिले. तिथे एक जण आणलेली घागरीतील पाणी झाडांना घालत होता. हे पाहून मला खरंच खूप बरे वाटले. झाडाला टवटवी आणण्यासाठी हा माणूस पाणी घालत आहे. या पाण्याने झाडाची वाढ होणार आहे. असे जर का आपण केले तर! हा विचार माझ्या मनात त्या क्षणी डोकावून गेला. हे अगदी एक साधे उदाहरण होते. आपल्या घरातला नळ सुद्धा पहा आपण कसा उघडा ठेवतो.
एक कप धुवायला आपल्याला अर्धा लिटर पाणी लागते. हे मी कमीत कमी सांगते. घरातला धुणं धुताना बादली वाहून जात असते. आपल्या घरात कामवाली बाई असेल तर नळ चालू असतो.आणि ती भांडी घासताना सेम असते. हे प्रत्येक घरोघर दिसणारे दृश्य आहे. आपण जाग कधी होतो माहिती आहे का. जेंव्हा सोसायटीच्या बोर्डवर नोटीस लागेल आज पाणी येणार नाही. त्यावेळेला मात्र आपली धावपळ सर्वांनाच माहिती आहे मी सांगायची काही गरज नाही. पेपर मध्ये बातमी येते गुरुवार आहे आज पाणी येणार नाही. त्यावेळी आपण चार बादल्या भरून ठेवतो टाकी असेल तर टाकी भरून ठेवतो. आणि मग पाणी कमीच आपण वापरतो. मग हेच पाणी आपण योग्य तऱ्हेने नीट वापरले तर. जपून वापरले तर! असा अनेकदा विचार येतो.
ज्या डोंगराळ भागांमध्ये पाण्याचा खूप अभाव आहे. जिथे लोकांना पाणी मिळत नाही. तिथे पाण्याचे खूप हाल आहेत. अजूनही काही गाव अशी आहेत की तिथे पाणी भरून डोक्यावर आणावे लागते. तर अशा लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही पण, शासनाने त्यांच्यासाठी काहीतरी योग्य उपाय केले पाहिजेत. असे मला खरंच मनापासून वाटतंय. आपण शहरांमध्ये जलजीवन मस्त जगत आहोत. तर तिकडे जलाविना प्राणी हत्या होताना पाहिलेले आहे. खूप लांबून लोकांना पाणी आणावं लागत आहे हे पाहिलेले आहे. म्हणून आपण सर्वांनी खरच पाण्याचा योग्य वापर करावा पुन्हा एकदा सांगते.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी जिल्हा पुणे



