Breaking
कविताकोकणमहाराष्ट्रसाहित्यगंध

आयुष्यावर बोलू काही..

प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड.

0 4 8 3 0 0

आयुष्यावर बोलू काही..

आज एकांती असताना
मनास काय झाले कळेना
आयुष्यावर बोलू काही
म्हणून, मज काही सुचेना..

किती ते आयुष्याचे पदर
कितीक आठवांचे सदर
चढ उतारांचा प्रवास कलंदर
किती बोलायचे एकंदर..

किती नाती, मित्रमंडळी
एकत्र मनात साठवली
प्रत्येक दिवसाची आठवण
मनात घर करून ठेवली..

किती चुकांचं ओझं वाहीलं
किती निर्णय बरोबर घेतले
कितीक जण सोडून गेले
सरतेशेवटी एकटेपण आले..

खरंच का आयुष्य सोपं असतं
जगायचं म्हणून जगायचं असतं
आयुष्यावर बोलू काही, म्हणताय
सगळ्यांनाच तसं जमत नसतं..

प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव-रायगड.
=============

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे