आम्ही बालकवी स्पर्धेतील निवडक कविता
मुख्य संपादक; राहुल पाटील
*बिळातच बरा*
उंदिरमामा उंदिरमामा
रुसलास का रे माझ्यावर
हल्ली बिळातून निघत नाहीस
संकट आले का तुझ्यावर ॥
बिळातून बोलले उंदिरमामा
कुणालाच नकोय माझा तोरा
जिकडे तिकडे विषाचा मारा
मी आपला बिळातच बरा ॥
कपाटात शिरण्याचा चोरमार्ग
शोधून देतो तुम्हाला
कपडे कुरतडले म्हणून लगेच
आरोपी करता मला ॥
मलाही जगण्यासाठी हवे
धान्य रोज नवे नवे
कोठीघरात शिरतो जेव्हा
उपद्रवी म्हणता तेव्हा ॥
प्लास्टिक तुम्ही वापरता घरात
मग राग येतो मला
धारदार दाताचे शस्त्र करून
कापून काढतो त्याला ॥
दुडूदुडू खेळतो घरात
कानाकोपराची करतो देखरेख
मला मारण्यासाठी तुम्हीच
करता सारी फेकाफेक ॥
बाप्पाला घेऊन येईन तेव्हा
दाखविन माझा तोरा
तोपर्यंत मी माझ्या
इवल्याशा बिळातच बरा ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शीलदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*बिळातच बरा*
बिळातच बरा तू मुंगळा
बाहेर येऊन सगळीकडे रांगा
घर नाही दार नाही
स्वतःचाच मिरवतो तोरा
खवळता थोडे आक्रमक बनून
सैरभैर शत्रूला शोधतो
खवळले नाही मी तरी
मलाच कडकडून चावतो
गोड आवडते मला
तुला पण तेच खायचे
हावरा आहेस इतका तू
खाऊन डब्यातच मरायचे
चावलास जर कोणाला
कातडी कापून काढतोस
रक्तबंबाळ जखम करून
तुटून तूही मरतोस
इतके काय शत्रूत्व तुझे
मला काही कळत नाही
चवताळून तू आलास की
कुठे लपावे समजत नाही
आहेस इतुकास तरी
तुझा आहे भारी दरारा
तुला लांबूनच मी पाहतो
येतोस ओळीत तरातरा
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सहप्रशासक /संकलक /परिक्षक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*बिळातच बरा*
अरे अरे उंदीर मामा
तू बिळातच बरा
शेतातील नासाडी
थांबव बाबा जरा
अहो अहो नागोबा
तुम्ही बिळातच बरे
येता तुम्ही घरात
बसती तुम्हाला फटकारे
अहो अहो ससोबा
तुम्ही बिळातच बरे
दिसता तुम्ही बाहेर
शिकारी तुमच्या मागे फिरे
*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*बिळातच बरा*
नागराज तुम्ही जगाचा देव,
आम्हा सर्वांना सुखी ठेव,
नागोबा तू जगाचा राजा खरा
पण बिळातच बरा ||
बाप माझा शेतात राबतो,
अनवाणी पायांनी काम करतो,
नागोबा तू जगाचा राजा खरा
पण बिळातच बरा ||
आई माझी शेतात राबते,
सारे शेत खुरपून काढते,
नागोबा तू जगाचा राजा खरा
पण बिळातच बरा ||
नागपंचमीला दूध देतो,
वरुळाची पूजा करतो,
नागोबा तू जगाचा राजा खरा
पण बिळातच बरा ||
पिकांची तू नासाडी रोखतो,
उंदरांना तू खाऊन टाकतो,
नागोबा तू जगाचा राजा खरा
पण बिळातच बरा ||
पिकांचे तू रक्षण करतो,
शेतकऱ्याचा तू मित्र बनतो,
नागोबा तू जगाचा राजा खरा
पण बिळातच बरा ||
*श्री पोपट सुखदेव मस्के*
*पंढरपूर, जि.सोलापूर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*बिळातच बरा*
उंदीर मामा उंदीर मामा
बिळातून बाहेर येतोस
नवे नवे कपडे अमूचे
सारे तू कुरतडतोस
शेतामध्ये सर्वत्र फिरून
धान्याची नासाडी करतोस
बेभान असा वागून किती
घरात पसारा करतोस
छोटी छोटी मुले तुला
बघून खूपच घाबरतात
तू सैरवैर होतांना घरात
दूरदूर पळून जातात
उंदीरमामा बिळातच बरा
तुझ्या शोधात मनीमाऊ
तू नको निघू आता बाहेर
नाहीतर आम्ही जहर देऊ
बिळातच बरा राहा सुखाने
विनाकारण उपद्रव्य करतोस
त्रास देता सकलांना उगाच
पिंजऱ्यात अडकला जातोस
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️