आरोग्य व शिक्षणनागपूरराजकियविदर्भ
उमरेडच्या रिंगणात विलास झोडापे उतरण्याची दाट शक्यता
0
1
9
5
9
9
उमरेडच्या रिंगणात विलास झोडापे उतरण्याची दाट शक्यता
रजत डेकाटे- प्रतिनिधी
मालेवाडा/ भिवापूर
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरेड मतदार संघात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे विलास झोडापे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. झोडापे यांनी नुकतीच रामटेक लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली आहे. यात त्यांना पराभवाचा सामना सुद्धा करावा लागला आहे. पुन्हा एकदा विलास झोडापे यांनी विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. विलास झोडापे हे विदर्भातील अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
0
1
9
5
9
9