0
4
8
3
0
0
शुकशुकाट
चिऊताई चिऊताई का गं
घरट्यात हा शुकशुकाट
कुठे गेला सांग नेहमीचा
तुझ्यासह पिल्लांचा गोंगाट//
आजकाल दिसे घरटे शांत
आवडू लागला का एकांत
एकटे एकटे राहताना
तुला नाही कशाचीच भ्रांत //
सांग ना चिऊताई एकदा
मनमोकळेपणाने बोल
काय तुझ्या मनात आताशी
मनातले राज आज खोल //
माणसा माणसा असा कसा
वागतोस तू सांग ना रे हल्ली
शुकशुकाट आहे घरट्यात
मोबाईल टॉवर हे गल्लोगल्ली //
त्रास होतोय हकनाक जीवाला
किरणांचा मारा होतोय अतिरेकी
शुकशुकाट आहे घरट्यात माझ्या
म्हणूनच झालीय तुझ्याशी बेकी //
दत्ता काजळे
तुरोरी जि. धाराशिव
======
0
4
8
3
0
0



