
0
6
1
1
8
5
आला पाऊस ओला
आला पाऊस ओला
झरझर घेऊन धारा
पदराशी खेळ खेळतो
भन्नाट गार वारा
नटखट पाऊस वेडा
छेड माझी काढतो
नाजूक ओल्या कायेला
आपसूक बिलगतो
सावरू कशी पदर
भिरभिरतो वार्यावर
आवरू कशी स्वतःला
मन राहिना थाऱ्यावर
ओघळती थेंब टपोरे
केसामधून गालावर
अन् थिरकतात पाय
या थेंबाच्या तालावर
पाऊस होवून बेधुंद
अलगद देहास कुरवाळे
प्रणयाची धुंदी चढली
गंध गात्रातून दरवळे
सौ इंदू मुडे, ब्रम्हपुरी
जिल्हा चंद्रपूर
0
6
1
1
8
5



