0
4
8
2
9
4
वारकरी
गळा तुळशीची माळ
चंदनाचा टिळा भाळी
पंढरीचा वारकरी
नाचे वाजवित टाळी !
गाई मुखाने अभंग
भजनात होई दंग
हरीपाठ नित्य मुखी
साधुसंत सदा संग !
पंढरीच्या सोहळ्याची
काय सांगू रीत न्यारी
ऊन पाऊस झेलत
घाट चढे वारकरी!
विठूरायाच्या भेटीला
आसुसले त्यांचे मन
धावे अश्वाच्या संगती
भोळ्या भक्तीचे रिंगण!
डोई तुळस माऊली
दिंड्या पताकांची दाटी
साऱ्या संतांच्या पालख्या
विठ्ठलाच्या भेटीसाठी !
सुनिता नाईक
कुरुळी,जि.पुणे
0
4
8
2
9
4



