ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
सांगा कुणी
सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर, मानकापूर नागपूर
0
4
8
2
9
3
सांगा कुणी
सांगा कुणी कुणासाठी,
मरतांना पाहिले का?…
कोणाविना कुणाचेही,
बाकी काही राहिले का?…१
किती झटा किती रेटा,
काम निघता पुसेना…
स्वार्थापुढे बाकी शून्य,
कुणी कुणाचं असेना…२
मिळे जोवर हवं ते,
घेती तोवर संज्ञान…
होता जेव्हा मिळेनासे,
करी खुले बदनाम…३
मतलबी दुनिया ही,
मतलबी व्यवहार…
मतलब निघताच,
वाटू लागतोय भार…४
स्वार्थ श्रेष्ठ ठरतांना,
कर्म ठरते कनिष्ठ…
प्रामाणिक जगण्याचे,
फळ मिळते अनिष्ट…५
सांगा कुणी सांगा कुणा,
परमार्थ धर्म पुन्हा…
‘सुधाकरा’ स्वार्थापोटी,
घडू नये कधी गुन्हा…६
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर, मानकापूर नागपूर
=======
0
4
8
2
9
3



