0
4
8
3
0
1
अभिलाषा
नकोत सूर्य,चंद्र,अन्, नको तारकांची आरास
मनात रेखाटले चित्र, त्याचा लाभावा सहवास
कोरले काळजात ज्याला, तो दरवळतो श्वासात
विचार नव्हता केला, कुणी येईल असा आयुष्यात
वाचेल भावना डोळ्यात, समजेल मौनाची वाणी
म्हणेल मोती अश्रूना,जे इतरांसाठी खारे पाणी
हवी अशी साथसंगत, आयुष्याला पूर्णत्व देणारी
एकदिलाने एकमुखाने, सुख दुःखे वाटून घेणारी
नसावे बोलणे जरुरी, कळावी डोळ्यांची भाषा
हवा नजरेचा एक दिलासा, मनी हिच अभिलाषा.
इंदू मुडे, ब्रम्हपुरी.
चंद्रपूर
0
4
8
3
0
1



