Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनधाराशिवमराठवाडासाहित्यगंध

जुना आणि नवा जमाना

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा जिल्हा धाराशिव

0 4 8 2 8 4

जुना आणि नवा जमाना

जुन्या जमान्यात स्वप्नं लहान होती,
पण त्या स्वप्नांना पंख होते,
अभावातही समाधान होतं,
आणि माणूस माणसाशी जवळ होता.
नव्या जमानीत साधनं अमाप झाली,
पण वेळ मात्र कमी पडतोय,
हातात सगळं असूनही आज
मन कुठेतरी हरवत चाललंय.
जुना जमाना शिकवत होता
कमीमध्ये जगायचं कसं,
पडून उठायचं धाडस कसं,
आणि हसत पुढे जायचं कसं.
नवा जमाना शिकवतोय
जलद जगा, पुढे धावा,
पण या धावपळीत
थांबून श्वास घ्यायलाच विसरू नका.
तेव्हा पुस्तकं कमी होती,
पण अनुभवांची शाळा मोठी होती,
आज माहिती अमर्याद आहे,
पण अनुभवांनाच वेळ नाही.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे