Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनावर अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनावर अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

जे.एस.एम. महाविद्यालयाचा पुढाकार

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग : ७ फेब्रुवारी २०२६ :
अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाच्या श्रीमती इंदिराबाई जी. कुलकर्णी कला, जे. बी. सावंत विज्ञान आणि सौ. जानकीबाई धोंडो कुंटे वाणिज्य महाविद्यालयात (जे.एस.एम.) ‘रिसेंट ट्रेंड्स इन सायन्सेस’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली.

आधुनिक काळातील विज्ञानाचे महत्त्व आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव अधोरेखित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही (हायब्रिड) माध्यमांत पार पडली. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी जागतिक स्तरावरील विषय हाताळल्याबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी संशोधनवृत्तीवर भर दिला. विज्ञानातील वेगाने होणारे बदल आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता संशोधनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा परिषदांमुळे विज्ञान आणि समाजाचा संबंध अधिक दृढ होतो आणि संशोधनाचे फायदे थेट लोकांपर्यंत पोहोचतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बिजभाषक प्रा. डॉ. आर. एस. लोखंडे यांनी “हरितगृह वायू आणि कार्बन प्रिंट” या विषयावर सादरीकरण करताना हरितगृह वायूंचे प्रकार, त्यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम तसेच जागतिक तापमानवाढीशी असलेला संबंध स्पष्ट केला. तसेच कार्बन फूटप्रिंट या संकल्पनेचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देत दैनंदिन जीवनातील विविध कृतींमधून होणारे कार्बन उत्सर्जन आणि ते कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

तर प्रा. डॉ. विजयकुमार योगेश मुळे यांनी संशोधनातील आधुनिक प्रवाह, आयसीटीचा (ICT) वाढता प्रभाव आणि विज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या नव्या संधी यावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. परिषदेचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे शोधनिबंध सादरीकरण होते. यामध्ये विविध राज्यांतून आणि देशांतून आलेल्या सुमारे १०० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला, तर ८० संशोधकांनी आपल्या संशोधन पेपरांचे सादरीकरण केले. या सादरीकरणांमुळे परिषद अधिक ज्ञानवर्धक व विचारप्रवर्तक ठरली.

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचा आंतरिक गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि विज्ञान विभाग यांनी परिषदेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

​या परिषदेचे आयोजन कॉन्व्हेनर (संयोजक) डॉ. एस. ए. कानडे (भौतिकशास्त्र विभाग प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्यांना को-कॉन्व्हेनर (सह-संयोजक) डॉ. ए. सी. घाटपांडे (प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व IQAC समन्वयक) आणि डॉ. प्रीती व्ही. फाटे (वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. निलम म्हात्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शिल्पा कवळे यांनी केले. एकूणच ही आंतरराष्ट्रीय परिषद संशोधन, नवविचार आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या दृष्टीकोनांना चालना देणारी ठरली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे